Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत महिलांसाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सांगलीत महिलांसाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

श्री गणपती पंचायतन संस्थान, सांगली यांच्या वतीने नवरात्रीच्या औचित्याने महिलांच्या आत्मसंरक्षणासाठी आणि सक्षमतेसाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर येत्या शनिवारी, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत सांगली येथील गणपती मंदिर परिसरातील सुनिती भवन येथे पार पडणार आहे. शिबिर प्रमुख ज्योती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण दिले जाणार असून, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

या शिबिरात सहभागी होणाऱ्या महिलांनी स्वतःसोबत काठी, पाण्याची बाटली आणि नॅपकिन आणणे आवश्यक आहे. शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना श्री गणपती पंचायतन संस्थानतर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल.

 नवरात्रीच्या निमित्ताने नारीशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९१५८१ ६००५७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.