Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपची जादू, कौस्तुभ गावडे विजयी; सचिन सानपांचा पराभव

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपची जादू, कौस्तुभ गावडे विजयी; सचिन सानपांचा पराभव 



पुणे : खरा पंचनामा 

पुणे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा विजय झाला. कौस्तुभ गावडे यांनी शिंदेसेनेचे उमेदवार सचिन सानप यांचा पराभव केला. मतमोजणीदरम्यान कौस्तुभ गावडे पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर सचिन सानप आणि तिसऱ्या क्रमांकावर दत्तात्रय सावंत होते. या निवडणुकीत भाजपची जादू पाहायला मिळाली. कौस्तुभ गावडे यांचा विजय होताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

पुणे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना १८,३८५ मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिंदेसेनेच्या सचिन सानप यांना ११,९८३ मतं मिळाली. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरशीची लढत झाली. कारण कौस्तुभ गावडे यांनी सचिन सानप आणि दत्तात्रय सावंत या दोघांचा दारूण पराभव करत विजय मिळवला. निकाल जाहीर होताच सचिन सानप यांनी नाराजी व्यक्त केली आणि अनेक गंभीर आरोप केले. 

पुणे पदवीधर शिक्षक मतदार संघातून भाजपचे उमेदवार कौस्तुभगावडे हे विजयी झाले. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दारात मोठा जल्लोष सुरू करण्यात आलेला आहे. राज्यातील कमी वयाचे आमदार म्हणून कौस्तुभगावडे यांना बहुमान मिळणार असून इथून पुढे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मार्फत आपण शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कार्यरत राहू असा विश्वास कौस्तुभ गावडे यांच्या पत्नी मयुरी गावडे यांनी व्यक्त केला आहे. विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांचे सचिन सानप यांनी अभिनंदन केले. 

पराभव झालेल्या सचिन सानप यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुख्य लढत ही भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि माझ्यात होती. त्यामुळे मतांच्या विभागणीचा प्रश्नच येत नाही. निवडणुकीत पैसे वाटल्याचे म्हटले जात आहे पण शिक्षकांना बदनाम करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. एक खंत मनात आहे की शिक्षकांनी शिक्षक आमदार निवडला नाही. कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची घोषणा काही वेळात होईल. पण आम्ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम करतच राहू.'

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.