विधानपरिषदेनंतर मोठा उलटफेर; माजी मंत्री भाजपची साथ सोडणार, राजकीय समीकरण बदलणार
लखनऊ : खरा पंचनामा
देशातील विविध राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. विधानपरिषदेच्या निकालानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. उत्तर प्रदेशातही आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री साहब सैनी यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. साहब सैनी हे शेकडो समर्थकांसहित अखिलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. साहब सिंह सैनी यांच्या निर्णयाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
साहब सिंह सैनी यांच्या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशातील नकुड विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होते. पक्ष प्रवेशानंतर नकुड विधानसभा मतदारसंघात साहब सिंह सैनी यांना तिकीट मिळणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. खरंतर नकुड विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाकडून अनेक दावेदार आहेत. त्यात अद्याप समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या जागावाटपात नकुडची जागा कोणाच्या पदरात पडणार, हे देखील अद्याप निश्चित झालेलं नाही. त्यामुळे येत्या दिवसांत नकुड विधानसभा मतदारसंघातील घडामोडींकडे राजकीय नेते लक्ष ठेवून असणार आहेत.
तीन दिवसाआधी श्रावस्ती जिल्हा पंचायत सदस्य देव प्रताप सिंह यांनी समाजवाद पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत उद्योजकतेज प्रताप सिंह यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला. देव प्रताप सिंह यांच्यासोबत शेकडो समर्थकांनी लखनौ येथील समाजवादी पक्षाच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेस करणार असल्याची घोषणा केली.
त्यांच्या पक्षप्रवेशाने श्रावस्तीमधील राजकीय समीकरण बदलल्याचे दिसून आले. देव प्रताप सिंह यांनी अखिलेश यादव यांच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून समाजवादी पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. विधानसभा निवडणुकीआधी बरेलीमध्येही मोठा उलटफेर झालाय. भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप आणि त्यांची मुलगी कीर्ति कश्यप यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. दोन्ही बाप-लेकीने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
