"तर पुन्हा एकत्र येऊ..."
पुणे : खरा पंचनामा
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. यावरून राजकीय तर्कवितर्काना उधाण आले आहे.
पुन्हा नवीन राजकीय समीकरणे निर्माण होण्याची चर्चा सुरु आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केले असून अशा कार्यक्रमांच्या निमिताने भविष्यात पुन्हा एकत्र येण्याचे सूतोवाच केले आहे.
'एका मोबिलिटी'च्या सहा उत्पादन प्रकल्पांचे ऑनलाइन उद्घाटन झाले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया, एका मोबिलिटीचे अध्यक्ष सुधीर मेहता व सुनंदा मेहता आदी उपस्थित होते.
यावेळी मुंबईतील कार्यक्रमाचा पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्या कार्यक्रमात हलकीफुलकी आणि हास्यविनोद फुलविणारी भाषणे होती. अशा कार्यक्रमातून महाराष्ट्राची एक चांगली संस्कृती समोर येते. राजकीयदृष्ट्या टीका करू शकत असलो, तरी अशा कार्यक्रमातून आम्ही एकत्र येतो, हीच संस्कृती महाराष्ट्राला अपेक्षित आहे. त्यातून वेगळा राजकीय अर्थ काढू नये. आमची बंद खोलीत बैठक वगैरे झाली नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.