आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी ! किती उमेदवार आघाडीवर? दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. ज्या पद्धतीने गोकुळचे चित्र रंगवण्यात आलं होतं, त्यानुसार गोकुळमध्ये घडलं नसल्याचं आतापर्यंतच्या मतमोजणीमधून स्पष्ट झालं आहे.
आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार गोकुळच्या मतमोजणीमध्ये जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये 50 टक्क्यांवर क्रॉस व्होटिंग झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे निकालाची उत्सुकता शेवटपर्यंत राहणार आहे. हे आता स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत 1650 मतदारांची मतमोजणी पूर्ण झाली असून, दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा क्रॉस व्होटिंगचा धसका दिसून आला.
विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी
दुसरीकडे महायुतीच्या सर्वसाधारण गटातील 20 पैकी 17 उमेदवार किरकोळ मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र, विनय कोरे यांच्या पॅनेलमधील सतेज पाटलांच्या आघाडीने घेतलेली मुसंडी मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे निकाल शेवटपर्यंत अनेकांना गुगली देत राहणार आहे. हे मात्र स्पष्ट होत आहे. समविचारी आघाडीकडून अभिजित तायशेटे, किसन चौगुले, राहुल देसाई आणि शशिकांत पाटील चुयेकर आघाडीवर आहेत.
आतापर्यंत सर्वसाधारण गटातील 1650 मतदानाची मोजणी पूर्ण
दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
मात्र महायुतीचे सर्वसाधारण गटातील 20 पैकी 17 उमेदवार किरकोळ मतांनी आघाडीवर
सतेज पाटील यांचे 3 उमेदवार आघाडीवर
आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी
आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी ! दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
सर्व तालुक्यात सरासरी 50 ते 55 टक्के क्रॉस व्होटिंगचा अंदाज
त्यामुळे निकालात शेवटपर्यंत चुरस राहणार
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.