गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वाईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधवांवर तात्काळ निलंबनाची कारवाई
सातारा पोलीस अधीक्षक यांचा आदेश !
सातारा : खरा पंचनामा
वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जालिंदर जाधव यांच्यावर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई करून सध्या त्यांची नियुक्ती सातारा नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
जाधव यांच्याकडून पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देणे, गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशाची मागणी करणे, होमगार्डला मारहाण झाल्याच्या प्रकरणात परस्पर तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करणे, तसेच महिला तक्रारदारांनी महिला पोलीस अंमलदारांशी असभ्य वर्तन करणे, अशा गंभीर तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे.
जाधव यांना पोलीस मुख्यालय सातारा उपाधीक्षक यांच्या पूर्व परवानगीशिवाय पोलीस मुख्यालय सोडता येणार नाही, निलंबनाच्या कालावधीत ते सातारा नियंत्रण कक्ष ते पोलीस उपाधीक्षक या ठिकाणी दररोज हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.