कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे अध्यक्षांचे आवाहन
सांगली : खरा पंचनामा
सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असून, संस्थेच्या ठेवी व भागभांडवलात समाधानकारक वाढ होत आहे. पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी सर्व सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांचे जाहीर आभार मानले आहेत. संस्थेचे कामकाज अत्यंत पारदर्शक आणि प्रगतीच्या दिशेने सुरू असून, कोणत्याही चुकीच्या बातम्यांवर किंवा अफवांवर सभासदांनी व ठेवीदारांनी विश्वास ठेवू नये, असे नम्र आवाहन त्यांनी या वेळी केले.
संस्थेच्या कामगिरीबाबत माहिती देताना अध्यक्ष श्रीमती चोपडे यांनी सांगितले की, पतसंस्थेकडे ठेवींचा ओघ सातत्याने वाढत असून स्वनिधी व गुंतवणुकीची स्थिती सुरक्षित आहे. कर्जाचे वितरण सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनच केले जात आहे. तसेच वसुलीचे काम समाधानकारक सुरू असून येत्या मार्च अखेर संस्थेला उत्तम आर्थिक निकाल मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चालू आर्थिक वर्षासाठी अध्यक्षा म्हणून श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे आणि उपाध्यक्ष म्हणून ॲड. एस. पी. मगदूम हे संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन सर्व निर्णय सभासदांच्या हितासाठीच घेत आहेत.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर संस्थेने सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध विशेष ठेव व कर्ज योजना आणल्या असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. यासोबतच एनपीएच्या बदललेल्या नियमांनुसार सर्व कर्जदारांनी वेळेवर मासिक हप्ते भरून आपली कर्जे नियमित ठेवावीत, अशी विनंतीही त्यांनी केली. पतसंस्थेच्या या प्रगतीत सर्व संचालक, कर्मचारी, ठेवीदार आणि ऑडिटर्स यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी रमेश वसंतराव ढबू, ओ.के. चौगुले, सौ. चंदन नरेंद्र केटकाळे, आप्पासाहेब दादू गवळी, बजरंग माळी डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, लालासाहेब भाऊसाहेब थोटे, रावसाहेब जिनगोंडा पाटील, डॉ. अशोक आण्णा सकळे, वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, डॉ. एस.बी. पाटील (मोटके), डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, अमोल विनायक रोकडे उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.