Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; 'त्या' फोटोमुळे अडचणींत वाढ?

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; 'त्या' फोटोमुळे अडचणींत वाढ?



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ मुंबईत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेत असतानाच, अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन सोबतचा त्यांचा फोटो अलीकडेच व्हायरल झाला. काँग्रेसने यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

ज्या दिवशी आपल्या परराष्ट्रमंत्र्यांशी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भेटत होते, त्याच दिवशी अमेरिकेच्या न्याय विभागाने पुरी आणि एपस्टीन यांच्या एकांतातील भेटीचा फोटो व्हायरल करून कोणाला ब्लॅकमेल केले? अमेरिकेने कोणाला राजकीय धमकी किंवा संदेश दिला हे समजण्यासारखे आहे. परंतु, या फोटोने हे स्पष्ट झाले की, पुरी आणि एपस्टीन यांच्यात मैत्री होती आणि त्यांच्या भेटीगाठी होत राहिल्या आहेत, असे काँग्रेसने म्हटले. तसेच, हरदीप पुरी यांचा आपण कधीही एपस्टीनला वैयक्तिकरीत्या किंवा एकांतात भेटलो नाही, हा दावा खोटा असून, असे असेल तर केंद्र सरकारने अमेरिकेला अशा प्रकारची खोटी छायाचित्रे प्रसिद्ध केल्याबद्दल नोटीस का पाठवली नाही? असा सवाल काँग्रेसने केला.

काँग्रेसशिवाय तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षानेही सरकारवर हल्ला चढवला आहे. या प्रकरणात पंतप्रधान मोदी यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना पंतप्रधान कोणत्या भीतीपोटी पुरी यांना मंत्रिमंडळात कायम ठेवून आहेत, असा सवाल विरोधकांनी उपस्थितीत केला.

...तर बाकीचे सदस्य कुठंय?

टीएमसी खासदार महुआ मोइत्रा म्हणाल्या की, पुरी म्हणाले की ते एपस्टीनला तीन-चार वेळा शिष्टमंडळासोबत भेटले होते, मग दोन्ही फोटोंमध्ये बाकीचे सदस्य कुठे आहेत? पुरी यांच्याकडे असे कोणते गुपित आहे, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले पाहिजे.

केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे

काँग्रेसने म्हटले की, केंद्र सरकारला हे सांगावेच लागेल की हा फोटो चुकीचा आहे की बरोबर. चुकीचा असेल तर विरोध दर्शवणारे पत्र जारी करावे आणि बरोबर असेल तर पुरी यांचा राजीनामा घेण्यात यावा. सोळा वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीशी मैत्री ठेवणाऱ्या व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवून पंतप्रधान कोणत्या विशिष्ट संस्कृतीचा संदेश देत आहेत?

पुरी पदावर कायम राहणार?

हा दबाव अशा वेळी येत आहे, जेव्हा भाजप पुरी यांना पुन्हा एकदा मध्य प्रदेशातून राज्यसभेवर आणण्याबाबत विचार करत आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या वेळी पुरी यांनी देशात ऊर्जा सुरक्षा कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे जगात तेल संकट कायम असल्याने त्यांना पदावर कायम ठेवण्यात येऊ शकते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.