Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आजारपणाच कारण देत सुट्टी घ्यायचा अन् करायचा 'गुन्हा'; पुणे पोलीस दलातील पोलिसाचा कारनामामुळे खळबळ, असं फुटलं बिंग

आजारपणाच कारण देत सुट्टी घ्यायचा अन् करायचा 'गुन्हा'; पुणे पोलीस दलातील पोलिसाचा कारनामामुळे खळबळ, असं फुटलं बिंग

पुणे : खरा पंचनामा 

पोलीस हे देशाचे संरक्षणासोबत सर्वसामान्यांचे रक्षणकर्ते... पण खाकी वर्दीतील पुण्यातील एका पोलिसांमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. हा पोलीस कर्मचारी आजारपणाचा सुट्टी घ्यायचा आणि या सुट्टीच्या नावाखाली स्वतःच गुन्हा करायचा. पोलीस दलाला त्याच्या या अधिकृत सुट्टीदरम्यानचा कारनामा कळला आणि तेच खळबळ माजली.

नितीन ज्ञानू शिंदे असं या पोलीस अंमलदाराचं नाव असून ते विश्रातबाग वाहतूक विभागात कार्यरत होता. नितीन हे 7 ऑक्टोबर 2026 पासून आजारपणाच्या सुट्टीवर गेला होता. पण तुम्हाला जाणून धक्का बसले त्याने आजारपणाचा बनाव केला होता. तर या सुट्टीच्या नावावर तो अमली पदार्थांच्या आंतरराज्यायी तस्करीचा गुन्हा करत होता. तो अमली पदार्थांच्या काळ्या बाजारात गुंतला होता.

हे प्रकरण तेलंगणातील वारंगलमधील आहे. इथे 25 ऑक्टोबरला नेक्कोंडा पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई करण्यात आली. तेलंगणाचे कनेक्शन पुण्यापर्यंत पोहोचलं. या कारवाई आजारपणाच्या सुट्टीवर असलेला नितीन शिंदे तब्बल 12 किलो गांजासह पकडल्या गेला. पोलिसांनी तो पोलीस असून या गुन्ह्यामध्ये अटक केली. पुणे पोलिसांना नितीन शिंदेचा कारनामा कळल्यानंतर त्यांनी अत्यंत कठोर कारवाई केली आहे.

पुणे शहर पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी कडक कारवाई केली आहे. नितीन शिंदे याला तातडीने थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.