पडळकर, संजय पाटील, अजितराव घोरपडे विजयी ; सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी !
सांगली : खरा पंचनामा
सांगलीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या निवडणुकीवर लक्ष होतं, त्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाजी मारली आहे. शिवाय संजय पाटील, अजितराव घोरपडेही विजयी झाले आहेत.
जत सोसायटी गटातून पडळकर यांनी विनोद पवार यांचा 20 मतांनी पराभव करत संचालकपदावर विजय मिळवला. गेल्या काही दिवसांपासून जत सोसायटी गटातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक चर्चेत होती. आता संपूर्ण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी समोर आली आहे.
जत सोसायटी गटातील गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीचा विषय चांगलाच चर्चेत आला होता. त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात गेले होते. उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज अवैध ठरवल्यानंतर पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर पडळकरांना मोठं यश मिळालं. तसेच दुसरीकडे, तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजय पाटील यांनीही विजय मिळवला आहे.
कवठेमंकाळमधून अजितराव घोरपडे, तासगावमधून संजयकाका पाटील, जतमधून गोपीचंद पडळकर, मिरजमधून अण्णासाहेब कोरे, अनुसूचित जाती गटातून कृष्णा कांबळे,
भटक्या जाती-जमाती गटातून संभाजी कचरे विजयी झाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
