Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इंडिया'चे शक्तिप्रदर्शन : ज्ञानेश कुमार यांच्यापाठोपाठ मोदी, शहा लक्ष्य

इंडिया'चे शक्तिप्रदर्शन : ज्ञानेश कुमार यांच्यापाठोपाठ मोदी, शहा लक्ष्य 



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून हटवले जाईल आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जाईल असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यांनी कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याचा विचारही करू नये, असा इशारा 'इंडिया' आघाडीच्या रामलीला मैदानावरील सभेत त्यांनी दिला. 

'मतचोरी'च्या मुद्द्यावर विरोधकांनी राजधानीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सभेला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल राहुल गांधी यांनी सर्वांचे आभार मानत, यातून नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच ज्ञानेश कुमार यांना स्पष्ट संदेश गेल्याचे नमूद केले. हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नव्हे तर जनतेचा आवाज आहे. मोदी कोठेही जाणार नाहीत असे अमित शहा म्हणत असले तरी, त्यांची जरी इच्छा असली तरी मोदी कोठेही जाऊ शकणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला. कितीही सत्ता आणि पैसा असला, तरी तुम्ही राज्यघटनेपेक्षा मोठे नाही असेही राहुल यांनी सुनावले. 

ज्ञानेश कुमार यांना हटविणे हा पहिला टप्पा असल्याचे सांगत, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर १३.५ कोटी मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचा दावा राहुल यांनी केला. ज्ञानेश कुमार यांच्या मदतीशिवाय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ शकले नसते असे राहुल यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्व संस्थांवर ताबा घेतल्याचा आरोप त्यांनी केला. हा मला धर्मापेक्षा महत्त्वाचा वाटतो असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. तुम्ही जर मला माझा धर्म विचारल तर मी जनतेचा आवाज सांगेन. भाजप आणि संघाने द्वेष पसरवला असून, ते देशासाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले. 

'इंडिया' आघाडीची सभा कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत शांततेत पार पडली. रामलीला मैदानावर आणि त्याच्या आसपास ४,००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. राजधानीतील अनेक मोक्याच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. दिल्लीत तैनात असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २७० कंपन्यांच्या नियुक्तीचा कालावधी १६ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.