Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आंदोलन करा, पण ठरावीक वेळेतच ! सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं; काय म्हणाले CJI सूर्यकांत ?

आंदोलन करा, पण ठरावीक वेळेतच ! सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं; काय म्हणाले CJI सूर्यकांत ?

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

ज्ञानेश कुमारांविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईला आव्हान देणारी यायिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या यायिकेवर मंगळवारी सुनावी झाली. यावेळी न्यायालयाने आंदोलनाच्या अधिकारासोबतच सार्वजनिक ठिकाणांवरील नागरिकांच्या मुक्त वावराचाही मुद्दा उपस्थित केला.

कोणतीही व्यक्ती किंवा संघटना आंदोलनाच्या नावाखाली एखाद्या सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी ताबा मिळवू शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितलं की, शेतकरी, पत्रकार आणि इतर सर्वांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, या आंदोलनासाठी कालमर्यादा निश्चित असणं गरजेचं आहे. एखाद्या संघटनेचं आंदोलन सुरू आहे म्हणून इतर नागरिकांची ये-जा रोखता येणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जंतर-मंतर हा सार्वजनिक रस्ता असल्याचा मुद्दा मांडला. आंदोलनासाठी केवळ एका दिवसाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आंदोलक तब्बल १७ दिवस तिथे थांबले होते, असा दावा त्यांनी केला. तसेच आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं.

दरम्यान, आंदोलनाला परवानगी देताना किंवा ती नाकारताना प्रशासनाने निर्णयामागची कारणं स्पष्ट करावीत, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी पुढील दोन महिने आंदोलनांवर बंदी घालण्याची मागणी केली. यावर वरिष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी सुमारे सात हजार लोकांना ताब्यात घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, आंदोलकांना ताब्यात घेतलं नसून आंदोलनस्थळावरून हटवलं, असा दावा तुषार मेहता यांनी केला.

सुनावणीदरम्यान आंदोलनस्थळांवरील सीसीटीव्ही निगराणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावले जातात, असं तुषार मेहता यांनी सांगितलं. सार्वजनिक ठिकाणी चेहरा कॅमेऱ्यात दिसणं म्हणजे गोपनीयतेचा भंग ठरत नाही, असं न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी स्पष्ट केलं.

मुकुल रोहतगी यांनी जंतर-मंतर आणि रामलीला मैदान ही दिल्लीतील पारंपरिक आंदोलनस्थळं असल्याचं सांगितलं. मात्र, आंदोलनांमुळे कनॉट प्लेसमधील दुकानं बंद ठेवावी लागत असून सणासुदीच्या काळात व्यवसायावर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला. यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली. यावर आंदोलन आयोजित करणाऱ्या सर्व संघटनांना या प्रकरणात पक्षकार करण्याचे निर्देश सरन्यायाधीशांनी दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.