मुंबई : गेल्या दोन वर्षांत ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) कामकाजात प्रचंड वाढ झाली असून, कामाचा वाढता बोजा लक्षात घेता सध्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या संख्येत तिपटीने वाढ करण्याची मागणी ईडीने केंद्र सरकारकडे केल्याचे समजते. सध्या देशभरात ईडीकडे एकूण २,१०० अधिकारी आहेत. मात्र, तपास प्रकरणांची वाढलेली संख्या लक्षात घेता आणखी ३,९०० अधिकाऱ्यांची गरज असल्याचा प्रस्ताव ईडीने पाठविल्याचे कळते.
सध्या २,१०० कर्मचारीईडीकडे सध्या संचालक ते लिपिक मिळून २,१०० कर्मचारी आहेत. मात्र, प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता ईडीला प्रामुख्याने प्रत्यक्ष तपास करणारे अधिकारी आणि सहायक तपास अधिकारी मोठ्या प्रमाणावर हवे आहेत.
मनी लाँड्रिंग आणि परकीय विनिमय चलन या दोन प्रमुख कायद्यांतर्गत येणाऱ्या आर्थिक प्रकरणाचा तपास ईडी करते. २०१२-१३ च्या तुलनेत २०१९ पासून आजवर ईडी तपास करत असलेल्या प्रकरणात तिपटीने वाढ झाली आहे. मात्र, या तपास यंत्रणेकडे मनुष्यबळ तितकेच आहे. २०१२-१३ मध्ये मनी लाँड्रिंगच्या एकूण १,२६२ प्रकरणांचा तपास ईडी करत होती. तर सरत्या तीन वर्षांत हाच आकडा ५,४२२ इतका झाला आहे. यापैकी १,१८० केसेस सन २०२१-२२ मध्ये दाखल झाल्या आहेत. २०१२ ते २०१९ या सात वर्षांत ईडीने परकीय विनिमय चलन कायद्याशी संबंधित एकूण ११,४२० प्रकरणांचा तपास केला. मात्र, गेल्या तीन वर्षांत या कायद्यांतर्गत करण्यात येत असलेल्या प्रकरणांची संख्या १३,४७३ इतकी आहे. (केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी अलीकडेच लोकसभेत ही आकडेवारी दिली होती.
तर ईडी सीबीआयपेक्षा मोठीसध्या ५,८०० अधिकाऱ्यांच्या फौजेसह सीबीआय ही देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा म्हणून ओळखली जाते. मात्र, जर ईडीची ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली तर ६ हजार अधिकाऱ्यांच्या संख्येसह ईडी देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा म्हणून ओळखली जाईल.
आर्थिक गुन्ह्यांचे विषय हे गुंतागुंतीचे असतात. ईडीच्या तपासामध्ये शोध, मालमत्ता जप्ती, परदेशात जाऊन तपास, मालमत्तेची वसुली, परदेशातील गुन्हेगारांचे हस्तांतरण अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. अलीकडच्या काळात प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता ईडीला आणखी मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांची गरज आहे. - कर्नाल सिंग, माजी संचालक, ईडी
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.