नवं नियुक्त पोलीस अधीक्षकांवर पहिल्याच दिवशी हल्ला
दोन पोलीस अधिकाऱ्यांसह एक कर्मचारी जखमी
बुलढाणा : खरा पंचनामा
बुलढाणा शहराच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात नुकतेच एका पोलिसांवर कोयत्याने हल्ला केल्याचे प्रकरण ताजे असतांना बुलढाणा शहरात देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
अवैध शस्त्र विक्रेत्याकडे छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह एक कर्मचारी जखमी झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. यात पोलिसांनी प्रतिकरासाठी गोळीबार देखील केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवं नियुक्त पोलीस अधीक्षकांवर पहिल्याच दिवशी हा हल्ला करण्यात आल्याने गुन्हेगारांना कायद्यासह पोलिसांचीही भीती उरलेली नाही का? असा सवाल या निमित्याने उपस्थित केला जात आहे.
मलकापूर शहरालगत असलेल्या म्हाडा कॉलनी परिसरात अवैध शास्त्राचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्री म्हाडा कॉलनी परिसरातील मनोजसिंग टाक याच्या घराजवळ गेले, दरम्यान लपून बसलेल्या आरोपी मनोजसिंग टाक याने पोलीस पथकावर तलवारीने हल्ला केला. यात एक सह्यय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक कर्मचारी असे तिघे गंभीर जखमी झालेत. त्यावेळी सोबत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने बचावासाठी आपल्या एसएलआर रायफलीतून तीन राऊंड आरोपीच्या दिशेने फायर केले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन आरोपी मनोजसिंग टाक फरार झाला आहे.
सध्या जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांवर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहे. यात आर्म अॅक्टनुसार ही गुन्हा दखल केला आहे. आज सकाळी पोलिसांनी याच परिसरात छापा टाकून अनेक शस्त्रे जप्त केल्याची माहिती दिली आहे. मात्र, मध्यरात्री झालेल्या पोलीस पथकावरील हल्ला आणि गोळीबाराच्या घटनेने नवनियुक्त पोलीस अधीक्षकांना गुंडांनी एकप्रकारे सलामी दिल्याचे समोर आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.