Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लाच देणाऱ्या 2 अभियंत्यांना सक्तमजुरीची शिक्षा

लाच देणाऱ्या 2 अभियंत्यांना सक्तमजुरीची शिक्षा सांगली : खरा पंचनामा 

गैरकारभाराची चौकशी थांबवण्यासाठी पाच हजारांची लाच देणाऱ्या महावितरणच्या दोन अभियंत्यांना न्यायालयाने एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. एस. एस. साने (६५, रा. सांगली), जिवंधर नेमिनाथ आलासे (७०, रा. सांगली) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. 

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. लाच देणाऱ्यावर झालेली ही राज्यातील पहिलीच शिक्षा असल्याचे सांगण्यात आले. सतीश साने महावितरणमध्ये कार्यकारी अभियंता, तर जिवंधर आलासे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. त्या दोघांच्या कामकाजामध्ये झालेल्या गैरकारभाराची चौकशी रणजित राजेशिर्के हे करत होते. 

प्राथमिक चौकशी करून चौकशीचा अहवाल दोन्ही संशयितांच्या बाजूने द्यावा म्हणून राजेशिर्के यांना पाच हजारांची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार देण्यात आली. जुलै २००७ साली सापळा रचण्यात आला. आरोपी हे फिर्यादी यांना लाच देण्यासाठी येत असताना बसस्थानक परिसरातील हॉटेलजवळ पकडण्यात आले. त्यानंतर आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. 

सरकार पक्षातर्फे फिर्यादी रणजित राजेशिर्के, पंच शरद दबडे, तपासी अधिकारी हेमंत जगदाळे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. शासकीय  कर्मचाऱ्यास लाच दिल्याप्रकरणी दोघांनाही एक वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. 

यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार वीणा जाधव यांचे सहकार्य लाभले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.