Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत 03 मोटरसायकली जप्त | सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक व त्याच्याकडून 03 मोटरसायकली जप्त, एकूण 1,20,000/-  रुपयांचा मुद्देमाल जप्त

खरा पंचनामा | सांगली 

सांगली शहर पोलीस ठाणे  हद्दीत मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत डी.बी पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय सुतार व पोलीस स्टाफ यांना सुचना दिल्या होत्या त्यानुसार पोना/२०७७ झाकीरहुसेन काझी यांना त्याच्या खास बातमीदाराच्या मार्फत माहीती मिळाली की सांगलीवाडी जकातनाका ते कदमवाडी दरम्यान असणा-या नाईकबा मंदिर समोर चोरीच्या मोटरसायकल विक्री करणेकरीता येणार आहेत.

अशी माहीती मिळालेने पोउपोनि सुतार,पोहेकॅा/१७५ पोहेकॅा/५४८ शिंदे पोशी/१०६५ माळकर पोशी/१५२ मोरे व दोन पंच असे मिळाले बातमी प्रमाणे सदर ठिकाणी सापळा लावला असता एक इसम ॲक्टीव्हा गाडी येत असताना दिसला त्यास ताबेत घेतले असता तो पळुन जावु लागला त्यास ताबेत घेतले असता त्याचे नाव गाव विचारतां त्याने त्याचे नाव बसवराज उर्फ बस्सु मल्लिकार्जुन बल्लाळी वयं २८ रा मशिबीनाळ त विजापुर राज्य कर्नाटक सध्या कुंभार गल्ली सांगलीवाडी त्यास सदरची मोटरसायकल बाबत विचारना केली असता उडवा-उडवीची उत्तरे देवु लागला त्यास पोउपोनि सुतार यांनी अधिक विश्वासात घेवून विचारना केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही १०ते १५ दिवसापुर्वी मारुती रोड व्यंकटेश व्हिडीओ गेम समोरुन चोरली आहे असे सांगितले त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता आणखी दोन मोटरसायकल ह्या नविन कृष्णा नदी ब्रीज खाली झुडपामध्ये लावलेल्या आहेत सदर ठिकाणी जावुन सदरच्या मोटरसायकल दोन पंचासमक्ष जप्त केल्या आहेत.

सदर आरोपीकडुन सांगली शहर पोलीस ठाणे गु.र. नं. 775/2022 भा.द.वि.स. कलम 379 या गुन्ह्यातील मोटरसायकल व आणखी २ मोटर सायकली अशा तीन मोटरसायकली एकुण १ लाख २० हजार रुपयेचा मुद्देमाल आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेल्या आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.