Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विट्यात नागरी सुविधा केंद्रातील दोघांना लाच घेताना पकडले



सांगली : खरा पंचनामा
नागरी सुविधा केंद्र तहसिल कार्यालय विटा येथील ऑपरेटर लोकसेवीका श्रीमती पुजा किशोर साळुंखे (वय ५२)  व प्रतिक किशोर साळुंखे (वय २८, दोन्ही रा. सावरकरनगर विटा) यांना १७००/-रूपये लाच स्विकारले नंतर रंगेहात पकडण्यात आले सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

तक्रारदार यांचे भावाच्या नावचा नॉन क्रिमिलेयर दाखल्याचे प्रकरण प्रांत कार्यालयास पाठवण्यासाठी श्रीमती साळुंखे यांनी तक्रारदार यांचेकडे २०००/-रूपये लाचेची
मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज सोमवारी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला
होता. तक्रारीनुसार दिनांक ०५.१२.२०२२ रोजी व दि.०६.१२.२०२२ रोजी ब्युरोच्या
कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणी मध्ये श्रीमती साळुंखे यांनी तक्रारदार यांचेकडे २०००/- रूपये लाचेची मागणी करून चर्चेअंती १७००/- रूपये घेवून येण्यास सांगीतल्याचे
निष्पन्न झाले.

त्यानंतर मंगळवारी नागरी सुविधा केंद्र तहसिल कार्यालय विटा या ठिकाणी सापळा लावला
असता सापळा कारवाई वेळी लोकसेवीका श्रीमती साळुंखे यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून १७००/- रूपये लाच रक्कम श्री. प्रतिक किशोर साळुंखे यांचेकडे देण्यास सांगीतली. त्याप्रमाणे प्रतिक किशोर साळुंखे यांनी १७००/- लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडून स्विकारल्यानंतर दोघांनाही पकडण्यात आले आहे. त्या दोघांविरोधात विटा पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुजय
घाटगे, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अविनाश सागर, संजय संकपाळ, सिमा माने, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, चालक अनिस वंटमुरे यांनी केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.