Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत पोलिसाची कॉलर पकडली, एकावर गुन्हा

सांगलीत पोलिसाची कॉलर पकडली, एकावर गुन्हा



सांगली : खरा पंचनामा

शहरातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलिसाला धक्काबुक्की करून त्याची कॉलर पकडून शर्टची बटणे तोडण्यात आली. यावेळी संशयिताने त्या पोलिसाच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून त्याचा अर्धवट तुकडा पळवण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल विलासराव वास्कर (रा. अच्युत अपार्टमेंट, पै प्रकाशच्या पाठीमागे, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी पोलिस सोमवारी रात्री ठाणे अमंलदार कक्षात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी संशयित राहुल तेथे आला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या राहुलने संबंधित पोलिसाशी वाद घातला.

उद्धट व अरेरावीची भाषा वापरुन, फिर्यादीच्या अंगावर धावून, फिर्यादिचे वर्दीचे कॉलर पकडून फिर्यादीच्या शर्टचे बटण तोडून, फिर्यादिस दुखापत केली. फिर्यादि बजावित असलेल्या शासकिय कामात अडथळा आणला तसेच फिर्यादिच्या गळयातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसडा मारुन त्याचा अर्धवट तुकडा घेण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी राहुल वास्कर याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणला तसेच चोरीचा प्रयत्न केला, पोलिस ठाण्यातील शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.