Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

यंत्रणा कामाला लावून लवासाची चौकशी करा : अजित पवार

यंत्रणा कामाला लावून लवासाची चौकशी करा : अजित पवारनागपूर : खरा पंचनामा

पुणे जिल्ह्यातील खासगी हिल स्टेशन लवासा प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला चॅलेंज दिलं आहे. राज्यातील यंत्रणा कामाला लावा आणि चौकशी करा असं आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे. 

पवार म्हणाले, माझी मागणी आहे, सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे आहेत. तुम्ही लगेचच केंद्रीय तसेच राज्यातील यंत्रणा कामाला लावा आणि चौकशी करा. आम्हाला काही अडचण नाही. तसेच लोकायुक्त कायद्याचं आम्ही स्वागत करू, त्यातील योग्य अयोग्य काही बाबी आहेत का? ते पाहू चर्चा करू, जर काहीं चुकीचं असेल तर नक्कीच आम्ही त्याला विरोध करु.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी अजित पवार म्हणाले, बेळगाव प्रश्न कोर्टात असताना कोणी लोकांना प्रोत्साहित केलं. कोणी ट्विट केलं हे सर्वांना माहिती आहे. हे अधिवेशन तीन आठवड्यांचं घ्यावं ही आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. विदर्भाचे प्रश्न असतील महागाई असतील बेरोजगारी असेल. हे मुद्दे महत्त्वाचे असताना महाराष्ट्राच्या अस्मितेचे मुद्दे पुढे केले जात आहेत.

यावेळी अजित पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधताना म्हटलंय, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपनेच प्रयत्न केले. हे आता सिद्ध झालं आहे. संजय राऊत यांनी काय व्हिडीओ ट्विट केला माहिती नाही. मात्र, आम्ही जो मोर्चा काढला, त्याचं कारण महापुरुषांचा सातत्यानं होणारा अपमान हे कारण आहे. राज्यपालांना त्यांच्या वक्तव्या संदर्भात हटवलंच पाहिजे. याचे कारण, मुद्दाम जाणून बुजून ही भूमिका घेतली जाते का? असा आम्हाला संशय आहे असं पवार म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.