Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जतचा एक्साईजमधील दबंग कर्मचारी राजू: झिरोचाच दबदबा

जतचा एक्साईजमधील दबंग कर्मचारी राजू: झिरोचाच दबदबा



जत : खरा पंचनामा

जत तालुक्यात एक्साईजचा दबंग कर्मचारी म्हणून राजुचा बराच बोलबाला आहे. तशा आशयाच्या पोस्टही सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पण खरा पंचनामाच्या टीमने याबाबत माहिती घेतली असता हा राजू दबंग कर्मचारी नसून झिरो असल्याचे अनेकांनी सांगितले. याबाबत विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनीही कानावर हात ठेवले आहेत.

जतमध्ये राजूवर फारच मोठी जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे त्याचा रुबाब एखाद्या अधिकाऱ्यापेक्षा कमी नव्हता. गेल्या बऱ्याच काळापासून तो संबंधित विभागाचा दबंग असल्यासारखे वागत आहे. मात्र त्याचा रुबाब, बोलणे यामुळे अनेक परवानाधारकांनी त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. नंतर त्याला गोळा करण्याच्या कामातून मुक्त करण्यात आले.

महत्वाच्या कामातून तो मुक्त झाला असला तरी एवढ्या मोठ्या जत तालुक्यातील अनेक बारकावे त्याला माहिती आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती नसलेल्या ठिकाणी त्याचा अजून वठ आहेच. 

त्या कामातून मुक्त झाल्यानंतर तो आता कार्यालयीन काम करत असल्याची चर्चा आहे. त्यातही मलई मिळवण्यासाठी तो तत्पर असतो असेही बोलले जात आहे. मुळात संबंधित विभागात त्याची नेमणूक नसतानाही त्याचे तिथे काय काम असा प्रश्न परवानाधारक विचारत आहेत. झिरो म्हणून बेकायदेशीर काम करणाऱ्या या राजूवर नवीन आयुक्त कारवाई करणार का तसेच त्याला एवढे अधिकार देणाऱ्या संगलीतील संबंधित लोकांवर कारवाई होणार का असा प्रश्न जत तालुक्यातील परवानाधारक विचारत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.