Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूरच्या महिला वकीलासह प्रवाशांना लुटले

कोल्हापूरच्या महिला वकीलासह प्रवाशांना लुटले



सांगली : खरा पंचनामा

कोल्हापूरहून पंढरपूरला निघालेल्या एका महिला वकीलासह प्रवाशांना मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन लाखांचा ऐवज लुटण्यात आला. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. 

यामध्ये एका महिलेसह दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी अज्ञात पाच अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अॅड. भाग्यश्री पाटील (रा. सरनोबतवाडी कोल्हापूर) या तवेरा (एमएच ०४ ईटी ८०३७) मधून निघाल्या होत्या. महामार्गावर कुचीजवळ असलेल्या एका हॉटेलपासून अर्धा किलोमीटर अंतरावर मोटारीवर दगडफेक झाली. यामुळे मोटार थांबविण्यात आली.

नंतर अज्ञात पाच जणांनी चाकूचा धाक दाखवत माधवी जानकर व विकास हेकडे या दोघांना मारहाण करून १ लाख ९१ हजाराचा ऐवज लुटला. यामध्ये सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल, कागदपत्रे यांचा समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.