Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पाटलाची पाटीलकी किती वर्षे?

पाटलाची पाटीलकी किती वर्षे? सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यात एक पाटील 2014 मध्ये गडचिरोली येथून आला. नक्षलवादी भागातून आल्याने त्याला विशेष शाखा दिली. करवीरमधील असल्याने या पाटलाने चांगलेच हातपाय पसरले. स्वतःच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेतला. नंतर या पाटलाचे धाडस फारच वाढले. 

गडचिरोली येथे भावाच्या नावावर घेतलेले टेंडर आणि त्याची कामे करण्यासाठी हा साक्षीचा बहाणा करून नेहमीच गडचिरोलीला जात होता तेथून रगड कमाई करून तो आल्याने कोणालाच जुमानत नव्हता आणि आजही जुमानत नाही. विशेष शाखेनंतर त्याने दोन तीन ठिकाणी सेवा बजावली पण प्रत्येक ठिकाणी या पाटलावर आरोप झाले, कारवाईही झाली. पण त्याला आणि वरिष्ठ लोकांना काहीच फरक पडला नाही. 

त्यानंतर तो आता सांगलीत विश्राम करतोय. तेथेही आलेल्या तक्रारीत तडजोड करण्यात त्याचा हातखंडा आहे. सांगली जिल्ह्यात 2014 ते 2022 अशी सलग 8 वर्षे काम करणाऱ्या पाटलाने बराच उच्छाद मांडला आहे. तो उद्याच्या भागात जाणून घेऊच.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.