रविवारी सांगली मॅरेथॉन मध्ये धावणार सांगलीकर
सांगली : खरा पंचनामा
येत्या २५ डिसेंबर रोजी सांगली मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत तीन हजार हून अधिक स्पर्धकांनी नाव नोदणी केली आहे. नोंदणी अंतिम टप्प्यात आली असून, शनिवार दि. २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०६ पर्यंत राजमती भवन येथे बीब व किट वितरण करण्यात येणार आहे.
राधेय सेवा फाउंडेशनने याचे आयोजन केले असून संयोजक डॉ. गणेश चौगुले यांनी अधिक माहिती दिली. नेमिनाथनगर येथील मैदानावरून सुरू झालेली मॅरेथॉन दोन ते २१ किलोमीटर अशा विविध विभागांत पूर्ण होईल. १४ वर्षांखालील मुले व मुली, १८ वर्षांखालील मुले व मुली, पाच किलोमीटरचा ग्रेट सांगली रन, १० किलोमीटरचा खुला गट, २१ किलोमीटरचा पुरुष गट, तसेच २ किलोमीटरचा ज्येष्ठ नागरिकांचा गट अशा विविध गटांतून सहभागी होता येईल.
विजेत्यांसाठी रोख बक्षिसे आहेत.
सांगली मॅराथॉन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, मे. गोविंद नारायण जोग अँड सन्स, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, भगीरथ सुझुकी, रोटरी क्लब, आयएमए, स्पंदन प्रतिष्ठान, रॉबिनहूड आर्मी, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, आदींच्या सहकार्याने संयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.