Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हल्दीसारखा पिवळा धम्मक मालही गेला अन...

हल्दीसारखा पिवळा धम्मक मालही गेला अन... सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यात एका यंत्रणेने हळदीसारखा पिवळा धम्मक माल 'शिताफीने' पकडला. संबंधित मालकावर दबाव टाकून डील पण ठरली. पिवळ्या मालाचा अधिकृत हिशेब मिळाला शिवाय मालकसोबत केलेली डील एका नेत्यामुळे सोडावी लागली अशी चर्चा जोरदार सुरू आहे. 

स्वतःला तीस मार खान समजणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी पिवळ्या धम्मक हळदीची माहिती नामचीन साहेबाना दिली. मग साहेबांनी माहिती देणाऱ्या लोकांसह एक पथक बनवून पिवळी धम्मक हळद ताब्यात घेतली. मग त्या हळदीच्या मालकाचा शोध सुरू झाला. हळदीचा मालक सापडल्यानंतर त्याच्याशी डील पण करण्यात आली. डील पूर्ण झाल्यावर साहेबासकट सगळे खुश झाले. 

पण पिवळ्या धम्मक हळदीचा मालक बेरक्या निघाला. हळदीच्या मालकाने थेट एका नेत्याला फोन लावला. हा नेता राज्य चालवणाऱ्या बड्या नेत्याचा निकटवर्तीय आहे. मग संगलीतील अशा नेत्याने फोनाफोनी करताच मूळ मालकाला पिवळी धम्मक हळद परत तर द्यावीच लागली शिवाय झालेली डील पण परत द्यावी लागली. 

एवढी मेहनत घेऊनही तेलही गेले आणि धुपाटनेही गेले याची खंत त्या साहेबासह टीम मधल्या लोकांना आहे. याची खुमासदार चर्चा मात्र जिल्ह्यात सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.