वकिलाची पोलीस अधिकार्याला मारहाण
पुणे : खरा पंचनामा
शेजाऱ्याला शिवीगाळ करणार्या वकीलास समजावून सांगत असताना वकिलाने सहायक पोलीस निरीक्षकाच्या अंगावर धावून जाऊन हातातील चावीने मारहाण करुन जखमी केले. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी प्रतीक अंकुश तावरे (वय ३५, रा. मार्केटयार्ड) या वकिलाला अटक केली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. मार्केटयार्ड येथील बुराणी कॉलनीत शुक्रवारी रात्री भांडण सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तेथे गेले. तेव्हा प्रतीक तावरे शेजारच्या हर्षल लाहोटे यांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करीत होते.
यावेळी कांबळे यांनी त्यांना समजावून सांगून शांत करीत असताना तो मी वकील आहे, असे म्हणून अश्लिल शिवीगाळ करुन पोलीस अधिकार्यांना हाताने बाजूला ढकलले. तसेच त्यांच्या अंगावर धावून येऊन हल्ला केला. हातातील चावीच्या टोकाने फिर्यादीचे तोंडावर मारुन डाव्या डोळ्याजवळ व पापणीवर दुखापत केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.