Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

झुंडशाही, दडपशाही, भ्रष्टाचारमुक्त माधवनगरसाठी विकास आघाडीच पर्याय!

झुंडशाही, दडपशाही, भ्रष्टाचारमुक्त माधवनगरसाठी विकास आघाडीच पर्याय!



सांगली : खरा पंचनामा 

माधवनगर मधील नागरिक सुज्ञ व आत्मसन्मानाने जगणारे आहेत. शांत व सुसंस्कृत गाव म्हणून माधवनगरची ओळख काही लोकांकडून जाणीवपूर्वक मिटवण्याचे काम केले जात आहे. झुंडशाही, दडपशाही व भ्रष्टाचार मुक्त माधवनगर करण्यासाठी माधवनगर विकास आघाडीच पर्याय असल्याचे मत सरपंच पदाच्या उच्च शिक्षित उमेदवार सौ. अंजुताई तोरो यांनी व्यक्त केले. 

सौ. तोरो म्हणाल्या, प्रत्येक वॉर्डमध्ये सुसंस्कृत, निर्व्यसनी,उच्चशिक्षित व युवा वर्गाला संधी दिली आहे. गावच्या विकासासाठी माधवनगर विकास आघाडीच्या माध्यमातून चांगला पर्याय नागरिकांना आम्ही दिला आहे. आम्हाला पैसे नको तर आम्हाला विकासकामे करणारे लोक हवेत असे माधवनगरमधील प्रत्येक नागरिक म्हणत आहे. आम्हाला झुंडशाही - दडपशाही नको तर मोकळा श्वास व नागरिकांना माधवनगर मध्ये स्वतःचे मत मांडणारे हक्काचे नेतृत्व हवे अशी मागणी नागरिक करत आहेत. म्हणूनच आम्ही विकास आघाडीचा पर्याय नागरिकांना दिल्याचे तोरो म्हणाल्या. 

निवडणुकीत दारूच्या बाटल्या वाटून संसार उध्वस्त करणारे नेतृत्व नको तर युवा वर्गाला एक नवी दिशा देणारे लोक हवेत. विकास कामाच्या बाबतीत टक्केवारीचे राजकारण नको तर सर्वसामान्य नागरिक सांगतील ते कामे दर्जेदार व तितकेच उत्कृष्ट पद्धतीने करून देणारे नेतृत्व हवे असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. आता ही निवडणूक कोणा एका व्यक्तीची राहिलेले नसून भ्रष्टाचार, झुंडशाही, दडपशाहीचा विरोधात संपूर्ण माधवनगरकरांनी हातात घेतली आहे.

५०० रुपयासाठी स्वतःचा आत्मसन्मान विकणार नाहीत. आमचे मत बहुमूल्य व तितकेच निर्णायक आहे. लोकशाहीचा वापर करत योग्य व गावचा विकासासाठी झटणाऱ्या, गाव निर्व्यसनी करण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या विकास आघाडीच्या पााठीशी उभे असल्याचे चित्र आहे. 

माधवनगर व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध असून या गावामध्ये डम्पिंग ग्राउंड, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, खेळाडूंसाठी नवीन ग्राउंडची निर्मिती, वाचनालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी बगीचा, अत्याधुनिक रस्ते, गोसावी, ख्रिश्चन व लिंगायत समाजाचा स्मशानभूमीचा प्रश्न, शासनाकडून येणाऱ्या योजना योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी माधवनगर विकास आघाडीच पर्याय असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.