Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईत तृतीयपंथीयावर मारहाण करून अत्याचार

मुंबईत तृतीयपंथीयावर मारहाण करून अत्याचार 



मुंबई : खरा पंचनामा 

मित्राला भेटायला गेलेल्या 26 वर्षीय तृतीयपंथीला तिघांनी मारहाण करत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आले. शिवाजीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पीडित तृतीयपंथीला मदत करायला पुढे सरसावलेल्या तृतीय पंथीयावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी फैजान सिद्दिकी (27) याला अटक केली आहे. 

गोवंडी परिसरात फिर्यादी तृतीयपंथी रात्री एकच्या सुमारास त्याच्या रफिक नगरमध्ये राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी जात होता. त्यावेळी फैजानसह त्याच्या साथीदारांनी त्यांची वाट रोखली आणि माराहाण केली. तसेच त्यांचे कपडे फाडून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. पीडित तृतीयपंथीला मदत करायला पुढे सरसावलेल्या तृतीय पंथीवरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. तृतीयपंथीने मदतीसाठी आरडाओरडा करताच तेथील आणखी एक तृतीयपंथी पुढे आला. परंतु संशयितांनी त्याच्याही डोक्यात धारदार शस्त्राने प्रहार केला. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. 

याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तृतीयपंथींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून फैजानच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.