Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नवी मुंबई पोलिसांनी शोधला चप्पलवरुन खुनी

नवी मुंबई पोलिसांनी शोधला चप्पलवरुन खुनी 



नवी मुंबई : खरा पंचनामा

नवी मुंबई पोलिसांनी अत्यंत क्लिष्ट, गुंतागुंतीचा खुनाचा गुन्हा केवळ चपलेवरून सोडवला. आणि महिलेच्या खुनातील संशयिताला अटक केली. 

पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी संशयिताला अटक केली. मृतदेह अज्ञात असल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती. अखेर महिलेच्या पायातील चप्पलवरुन पोलिसांनी खुन्याचा शोध सुरु केला. 

या महिलेने घातलेली नवीन ब्रँडेड चप्पल घेतलेल्या दुकानाची माहिती पोलिसांनी काढली. यानंतर दुकानाचे सिसिटीव्ही तपासले असता पोलिस संशयितापर्यंत पोहचले. संशयित बॉडी बिल्डर असल्याचे निदर्शनास आले. यावरून सर्व जिममध्ये माहिती घेतली असता घणसोली येथील एका जिम मध्ये आरोपी ट्रेनर म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या साथीदाराचा देखील सुगावा लागला. मुख्य आरोपी रियाज खान आणि सह आरोपी इम्रान शेख याच्या अटकेनंतर केलेल्या चौकशीत मयत महिलेची ओळख पटली आणि तिची सर्व माहिती हाती लागली. मृत महिला नेरुळ येथील एका बार मध्ये कामाला होती. तिचे मुख्य आरोपी रियाज खान सोबत प्रेम संबंध सुरु होते. 

वारंवार लग्नाचा तगादा लावत असल्याने तिची रियाजने आपला साथीदार इम्रानच्या सहकार्याने महिलेचा गळा आवळून हत्या केली. यानंतर आरोपींनी महिलेचा मृतदेह धामणी गावाजवळील उड्डाणपूलाखाली फेकून दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.