Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जयंत पाटलांचे निलंबन मागे घ्या : अजित पवारांची मागणी

जयंत पाटलांचे निलंबन मागे घ्या : अजित पवारांची मागणी 



नागपूर : खरा पंचनामा 

नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केली आहे. 

मागिल आठवड्यात जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली. एवढी कठीण शिक्षा करणे बरोबर नाही. म्हणून मी तुम्हाला कारवाई मागे घेऊन सहभागी करुन घेण्याची विनंती केली होती. मीही शांतपणे भूमिका घेतली. अध्यक्ष महोदय तुम्हीही सामंजस्य भूमिका गेतली होती. उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही मनाचा मोठेपण दाखवून पाटील यांच्यावरील कारवाई मागे घ्याल अस मला वाटतं, असे पवार म्हणाले. 

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री सध्या सभागृहात उपस्थित नाहीत. ते उपस्थित झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ. गेल्या आठवड्यात सभागृहात दिशा सालियन प्रकरणी एसआयटीची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली, यावेळी दालनात विरोधकांना बोलू देत नसल्याचा आरोप करण्यात आला. 

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरल्याचा आरोप सत्ताधारी गटातील सदस्यांनी केला आहे. यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.