Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बारामतीजवळ अपघातात इचलकरंजीच्या विद्यार्थिनी जखमी

बारामतीजवळ अपघातात इचलकरंजीच्या विद्यार्थिनी जखमी 



बारामती : खरा पंचनामा 

पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळ सहलीहून परतणाऱ्या इचलकरंजी येथील विद्यार्थिनींच्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात तीन मुली गंभीर जखमी झाल्या असून, 24 मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातातील जखमी विद्यार्थीनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

इचलकरंजी येथील सागर क्लासकडून विद्यार्थ्यांच्या सहलीचं आयोजन करण्यात आलं होते. ही सहल औरंगाबाद आणि शिर्डी अशी आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिर्डी येथून परत इचलकरंजीकडं जाताना बारामतीच्या पुढे पाहुणेवाडी गावात या बसचा अपघात झाला. 

या सर्व विद्यार्थीनी यशोदा ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करत होत्या. शिर्डीवरून इचलकरंजीकडं जाताना बारामतीच्या पुढे पाहुणेवाडी गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात 24 मुली किरकोळ व 3 मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. 

त्यांना उपचारासाठी बारामतीच्या महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी या बसमध्ये या बसमध्ये एकूण 48 मुली व 5 शिक्षक प्रवास करत होते.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.