Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई कोणाच्या बापाची नाही! फडणवीसांचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

मुंबई कोणाच्या बापाची नाही! फडणवीसांचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला नागपूर : खरा पंचनामा 

नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विरोधातील ठराव एकमाताने मंजूर करण्यात आला. याचे पडसाद कर्नाटक विधिमंडळात उमटले. कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी मुंबईत 20 टक्के कानडी लोक असल्याचे म्हणत मुंबईला केंद्रशासित करा अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्याही बापाची नसल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. या वक्तव्यातून त्यांनी कर्नाटकच्या त्या मंत्र्यांसह उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याचे बोलले जात आहे. 

सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला विषय महत्त्वाचा आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत दोन्ही राज्यांनी नव्याने दावे केले जाणार नाहीत हे मान्य केले होते. आपणही काल ठराव करताना सर्वोच्च न्यायालयात जो दावा आहे, त्यानुसारच ठराव केला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी तसचं काँग्रेस अध्यक्षांनी केलेले दावे त्या बैठकीशी विसंगत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत असे फडणवीस म्हणाले. 

मुंबईवर दावा सांगणं खपवून घेतले जाणार नाही. त्या बद्दल आम्ही निषेध करतो. विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे तशा प्रकारचं निषेधाचे पत्र आम्ही त्यांना पाठवू. गृहमंत्र्यांसमोर जे ठरलं आहे त्याचं उल्लंघन करणं दोन राज्यांमधील संबंधांसाठी योग्य नाही. हे त्यांना कडक शब्दात सांगण्यात येईल. तसेच तुमच्यासमोर जे ठरलं होतं त्याचं कर्नाटक पालन करत नसल्याचं गृहमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून दिले जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

मुंबई कोणाच्या बापाची नाही 

केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे, अशी विनंती करणार आहे. मी पुन्हा सांगतो की, मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही, त्यावरचा कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. फडणवीस यांच्या मुंबई बद्दलच्या या वक्तव्यातून त्यांनी ठाकरे यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा रंगली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.