Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अकोल्यात सुपारी देऊन पतीचा खून

अकोल्यात सुपारी देऊन पतीचा खूनअकोला : खरा पंचनामा

अकोल्यापासून जवळच असलेल्या पुंडा येथे पत्नीने गावातीलच एकाला ३० हजाराची सुपारी देवून पतीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अवघ्या १२ तासाच्या आत दहीहांडा पोलिसांनी संशयितांना अटक करण्यात यश मिळवले. पुंडा येथील कांचनचा विवाह पातूर तालुक्यातील पास्टूल येथील सचिन बांगर याच्याशी झाला होता. मात्र पती सचिन बांगर तिला वारंवार त्रास देत होता. 

त्यामुळे तिने पतीचा काटा काढायचे ठरवले. नंतर कांचनने गावातील दिगंबर मालवे यास तीस हजार रुपये देवून पतीचा काटा काढण्याची सुपारी दिली. २८ डिसेंबर रोजी सचिन बांगर हा पुंडा येथे आला. त्याचा घरात गळा आवळून आधी खून केल्यानंतर मृतदेह गावातीलच एका ठिकाणी व्यायाम करण्याच्या लोखंडी अँगलला लटकवून आत्महत्या असल्याचे भासवले.

मात्र, दहीहांडा पोलिसांनी अधिक तपास करून घटनेचा उलगडा केला. याप्रकरणी दहीहांडा पोलिसांनी कांचन बांगर हिच्यासह दिगंबर मालवे यास अटक केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.