Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला, तरुणाची एकाच घरात आत्महत्या

महिला, तरुणाची एकाच घरात आत्महत्या



पुणे : खरा पंचनामा

एका महिलेने आणि तरुणाने एकाच घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात ही घडना घडली आहे.

बरखा मंडल आणि राजू फारुख शेख अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. बरखा आणि राजू यांची बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत ओळख झाली होती. दोघांनीही चार दिवसांपूर्वीच कात्रज परिसरात भाड्याने रुम घेतली होती. त्यामुळे घरासंदर्भात कोणतंही अग्रीमेंट करण्यात आलं नव्हतं. 

या घराचा दिवसभर दरवाजा उघडण्यात आला नव्हता. त्यामुळे शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा उघडून घराची पाहणी केली. राजू घराच्या हॉलमध्ये तर बरखाने घराच्या किचनमध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांना आढळलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.