Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'त्या' अधिकाऱ्याच्या बदलीने कर्मचाऱ्यांमध्ये फील गुड

'त्या' अधिकाऱ्याच्या बदलीने कर्मचाऱ्यांमध्ये फील गुड 



सांगली : खरा पंचनामा 

राज्य शासनाने शुक्रवारी शेकडो अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. यामध्ये सांगलीत वादग्रस्त ठरलेल्या एकाचा समावेश आहे. त्या अधिकाऱ्याच्या बदलीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये फील गुडचे वातावरण आहे. मंथलीसाठी त्रास देणारी व्यक्ती बदलून गेल्याने अनेकांनी खासगीत आनंद व्यक्त केला. 

संबंधित अधिकारी सांगली जिल्ह्यात आल्यानंतर चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर प्रभारी म्हणून काम असताना त्याच्यावर गँभीर गुन्हा दाखल झाला. त्यातून सुटल्या नंतर त्यांना मुख्यालयात पाठवण्यात आले. तिथे गेल्यावर त्यांनी एक नंबर साहेबांवर चांगलीच जादू केली अशी चर्चा आहे. मग त्या एक नंबर साहेबांनी त्यांना होमचा चार्ज दिला शिवाय वाचण्यासाठीही बसवले. आर्थिक व्यवहारही दिले. नंतर वाहनांची शाखा पण दिली. त्यानंतर बदली झालेले साहेब सुसाट सुटले. 

इतक्या सगळ्या विभागांचा चार्ज मिळाल्यावर साहेबांनी मंथलीसाठी कर्मचाऱ्यांचा छळ सुरू केला. न देणाऱ्यांची नावे वरिष्ठ लोकांना देऊन त्यांना हिसका दाखवला. त्यामुळे त्यांचा वट चांगलाच वाढला. दिवाळी दिली नाही म्हणून त्यांनी अनेकांचा अलीकडेच बळीही घेतला. 

त्यांच्या बरोबरीचे अन्य अधिकारी मुख्यालयात असतानाही जुन्या साहेबांनी बदली झालेल्या त्या अधिकाऱ्याचे लाड का केले असा प्रश्न आता विचारला जात आहे. अशा त्रास देणाऱ्याची बदली झाल्याने कर्मचारी मात्र आनंदात आहेत अशी चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.