Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भिवंडीत तरुणाचा गोळ्या झाडून खून

भिवंडीत तरुणाचा गोळ्या झाडून खून



भिवंडी : खरा पंचनामा

भिवंडीमध्ये ठाण्यात कामगार पुरवणाऱ्या दोघांमधील वाद विकोपाला जाऊन एका तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला.

या घटनेत जखमी झालेल्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश कोकाटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ठाणे येथील लोढामध्ये काम पुरवण्याच्या कामावरुन गणेश कोकाटे आणि गणेश इंदुलकर यांच्यात वाद होता. या घटनेच्या अगोदरदेखील गणेश कोकाटे यावर गणेश इंदुलकर याने गोळीबार केला होता. गणेश कोकाटे त्यातून थोडक्यात बचावला होता. या प्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत चार जणांना अटक केली होती.

घटनेच्या दिवशी संध्याकाळी गणेश कोकाटे ठाणे येथून कशेळी येथील घरी जात असताना त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. दुचाकीवरुन आलेल्याने गणेश कोकाटे याच्यावर गोळ्या झाडल्या आणि तो पसार झाला. या गोळीबारामध्ये गणेश कोकाटे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्यावसायिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.