Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ

चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ 



मुंबई : खरा पंचनामा 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा उल्लेख बलात्कारी म्हणून केला होता. त्यावरून मेहबूब शेख यांनी शिरूर पोलीस ठाण्यात चित्रा वाघ यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यावरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शेख यांच्याकडून दावा दाखल करण्यात आला होता. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत मेहबूब शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच दरम्यान चित्रा वाघ यांनी बलात्कारी असा उल्लेख केल्याने मेहबूब शेख यांनी बीड न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून चित्रा वाघ यांच्यावर दाखल केलेला अब्रूनुकसानीचा दावा कासार न्यायालयाने स्वीकृत केला आहे. यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय. 

काही लोक जे स्वतःला न्यायाधीश समजण्याच्या नादात इतरांची बदनामी करतात आणि आपणच खूप शहाणे असल्याचं समजतात. त्या लोकांच्या विरोधात हे माझ्या न्यायालयीन लढाईचे पहिले पाऊल, आज कोर्टाने त्याची दखल घेतली आहे, असं मेहबूब शेख यांनी म्हटलंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.