Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईत तीन चोरट्या बहिणींना अटक

मुंबईत तीन चोरट्या बहिणींना अटक



मुंबई : खरा पंचनामा

दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या तीन बहिणांना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही बहिणींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या तीन बहिणी अतिशय हुशारीने निर्जन वस्तीत घुसतात. चोरी करतात आणि दिवसाढवळ्या डल्ला मारून पळून जातात.

या तिघींना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडून 4 सोन्याच्या अंगठ्या, 4 मोबाईल फोन आणि 24 हजारांची रोकड जप्त केली आहे. सुजाता सकट, सारिका सकट, मीना उमेश इंगळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

29 नोव्हेंबर रोजी कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरात घुसून लॉकरमधील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून या तिघी पसार झाल्या होत्या.
या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, कस्तुरबा मार्ग पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखा युनिट 12 ची टीम या चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते आणि अखेर तिघेही गुन्हे शाखेच्या हाती लागले.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही बहिणी कुर्ला परिसरातील रहिवासी आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.