Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लाखाची लाच घेताना महावितरण महिला अधीक्षक अभियंत्यासह दोघे जाळ्यात

लाखाची लाच घेताना महावितरण महिला अधीक्षक अभियंत्यासह दोघे जाळ्यात



पालघर : खरा पंचनामा 

पालघर येथील महावितरणच्या महिला अधीक्षक अभियंता किरण नागावकर व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये  या दोघांना एक लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही करवाई सोमवारी  प्रताप मचिए यांच्या कार्यालयात केली.
 
याबाबत तक्रारदार यांनी पालघर एसीबीकडे बुधवारी तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्यावर महावितरण अंतर्गत दोन ते तीन तक्रारी दाखल असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी या दोघांनीही दोन लाख रुपये लाच मागितली. परंतु तक्रारदार यांनी लाचेची रक्कम जास्त असल्याचे सांगत तडजोडी नंतर दीड लाख करण्यात आली.

यानंतर पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. पथकाने महावितरण कार्यालयात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेताना प्रताप मचिए यांना त्यांच्या कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले. यानंतर किरण नागावकर यांना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.