Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली महापालिकेविरोधातील तक्रारीत तथ्य; लोकयुक्तांची टिपणी

सांगली महापालिकेविरोधातील तक्रारीत तथ्य; लोकयुक्तांची टिपणी



सांगली : खरा पंचनामा

महापालिकेतील वीज बिल घोटाळ्यासह तब्बल दहा प्रकरणातील अपहारांच्या चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्तांनी लोकायुक्तांना सादर केला आहे. याप्रकरणी आज मंगळवारी लोकायुक्तांकडे सुनावणी होणार झाली. मात्र विभागीय आयुक्तांचा अहवाल उशिरा आल्याने आता ही सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी लोकयुक्तांनी अहवालाचा सारांश पाहून तक्रारीत तथ्य असल्याचे म्हटले आहे.

येथील नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर तानाजी रुईकर, रवींद्र चव्हाण यांनी महापालिकेच्या गैरकारभाराबाबत • लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. यावर लोकायुक्त कार्यालयात आज सुनावणी झाली.

वीज बिलांचे दहा वर्षाचे लेखा परीक्षण केल्यास हा घोटाळा १० ते १२ कोटींच्या घरात जाऊ शकतो. २००१ ते २०१० या कालावधी महापालिकेच्या लेखा परीक्षणात अनेक आक्षेप एचसीएल प्रकल्पासह विविध नोंदविण्यात आले आहेत. या प्रकल्पाबाबत केलेल्या १० प्रकरणांची आक्षेपाबाबत संबंधितांवर जबाबदारी लोकायुक्तांनी दखल घेतली होती. निश्चित करून वसुली करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

वीज बिल घोटाळ्यासह, घनकचरा प्रकल्प, एचसीएल प्रकल्प, शेतकरी बँकेतील ठेवी अशा महापालिकेतील विविध घोटाळ्याबाबत वि. द. बर्वे, साखळकर, रुईकर, चव्हाण यांनी तक्रारी केल्या आहेत. 

या तक्रारीवर पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिला आहे. त्यानुसार आज लोकयुक्तांकडे सुनावणी होणार होती मात्र ती पुढे ढकलण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.