Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दुसऱ्याची जमीन विकण्याचा प्रयत्न : पोलिसासह तिघांना कोठडी

दुसऱ्याची जमीन विकण्याचा प्रयत्न : पोलिसासह तिघांना कोठडी



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील रसुलवाडी येथील जमीन विक्री करायची असल्याचे सांगून 31 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका पोलिसासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसानी एका पोलिस शिपायासह तिघांना अटक केली आहे. तिघांनाही चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पोलिसासह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी विनायक रामचंद्र सुतार (रा. वासुंबे ता. तासगाव), पोलिस शिपाई कृष्णदेव रामचंद्र पाटील, (वय ३५), अरविंद पाटील (वय ३५, रा. बलवडे, ता. तासगाव) यांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी जयदेव काळे (रा. जायगव्हान, ता. कवठेमहांकाळ) यांनी फिर्याद दिली आहे.
  
 याप्रकरणी विनायक सुतार, पोलिस शिपाई कृष्णदेव पाटील, अरविंद पाटील, सुधीर शिंगाटे, अनोळखी 8 जण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सर्व संशयितांनी संगणमत करून जानेवारी २०१८ मध्ये
कवलापुर गावचे हदीत तासगाव फाटा ते कवलापुर जाणारे रोड वर असले रसुलवाडी रोड स्मशान भुमी च्या उत्तरेकडील ८ एकर १६ गुंठे शेत जमीन ही विक्रीस निघाली आहे असे सांगितले. ती जमीन मला पसंत पडली म्हणुन मी विजय चव्हाण यांना शेत जमीनीचा दोघांमध्ये व्यवहार करु असे म्हणून जमीन मालकांना समोर बोलावुन घेणेस सांगितले होते. 

त्याप्रमाणे सुतार, अरविंद पाटील, कृष्णदेव पाटील, शिंगटे ऊर्फ पाटील यांनी जमीनीचे करारपत्रवर फोटो असलेले काही लोक मुळ मालक नाहीत हे माहीत असुन देखील संशयितांनी आम्हाला फसवण्याच्या उद्देशाने तेच त्या जमीनीचे मुळ मालक आहेत असे आम्हाला ओळख करुन देवून त्यांना व्यवहारासाठी समोर आणले. 

जमीनीची १ कोटी २० लाख रुपये रक्कम त्यांचे करवी आम्हास सांगुन त्यांची वरील ८ लोकांची बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्र तयार करुन व्यवहाराची खोटी करण्यात आलेल्या करार पत्रास ती जोडुन त्यावर त्यांना सहया करणेस सांगुन हजर असलेले लोकच जमीनीचे मुळ मालक आहेत असे आम्हाला भासवले. ठरवलेल्या जमीनीचे व्यवहारासाठी इसारत म्हणुन १ लाख रुपये रोख व ७/१२ वरील बँकेचा बोझा कमी करणेसाठी  माझे व विजय चव्हाण कडुन रोख २४ लाख रुपये व चेकने ६ लाख रुपये असे एकुण ३१ लाख रुपये घेतले.

माझी फसवणुक झाले नंतर मी वेळोवेळी आरोपींना माझी फसवणुकीची रक्कम परत मागितली असता ते वेळोवेळी रक्कम परत देवु असे आश्वासन देत होते. त्यामुळे पैसे परत मिळतील या आशेवर मी आज रोजी पर्यत तक्रार दिली नव्हती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.