Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तीन त्रिकुट अन त्या विशेष शाखेचा होतोय इस्कुट!

तीन त्रिकुट अन त्या विशेष शाखेचा होतोय इस्कुट!सांगली : खरा पंचनामा

सांगलीतील एका विशिष्ठ शाखेला तीन त्रिकुटाच ग्रहण लागलं आहे. जुना सायबर तज्ञ, इंटरनॅशनल बातम्या ठेवणारा खबऱ्या आणि स्वतःला 'बिर'बल समजणारा या त्रिकुटाने सगळाच कारभार हातात घेतला आहे. प्रभारीला सुद्धा मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून भुलवले आहे. नवीन आलेल्या साहेबाला बकरा बनवून स्वतःची वेगळी ओळख एक नंबर साहेबांकडे दाखवण्यात यांचा हातखंडा आहे. यातून ते एकावर 'निशाणा' साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

शाखेतील या त्रिकुटाने यापूर्वी अनेक साहेबांचे देव उठवले आहेत. त्यामुळे चांगले साहेब यांना चार हात लांबच ठेवतात. आता या त्रिकुटाने एक नवीन बकरा शोधला आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते यांनी ज्याचा वाझे म्हणून उल्लेख केलाय त्याच्याशी या त्रिकुटाची चांगलीच गट्टी जमलीय.

प्रभारी अधिकाऱ्याला भूल थापा देऊन हे त्रिकुट अख्खी शाखाच चालवत असल्याची चर्चा आहे. जुन्या सायबर तज्ञाने यापूर्वी एक नंबर साहेबाला इम्प्रेस करण्यासाठी त्यावेळच्या प्रभारी अधिकाऱ्याचा बळी दिल्याची काही उदाहरणे आहेत. इंटरनॅशनल माहिती ठेवतो आणि देशासह परदेशातील अधिकारी मला कसे भाव देतात अशी बतावणी करणारा खबऱ्या तर परत परत त्याच किंवा तशाच शाखेत नियुक्तीसाठी भंडारा उधळत असतो.

यातील 'बिर'बलला तर सॅल्यूटच करायला हवा अशी चर्चा आहे. हा बिरु गुन्हेगार लोकांना हाताशी धरून काही गोष्टी घडवतो असे बोलले जाते. या त्रिकुटाने आता एका साहेबाला 'निशाण्या'वर धरले आहे. 

वर्षानुवर्षे ठराविक विशेष शाखेतच काम करणाऱ्या या तिघांनाही मागील एक नंबर साहेबांनी जागा दाखवली होती. आता त्यांचे प्रभारी आणि एक नंबर साहेब सावध होणार का असा प्रश्न या त्रिकुटाचे सहकारी विचारत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.