Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला डॉक्टरवर वॉर्डबॉयचा खुनीहल्ला!

महिला डॉक्टरवर वॉर्डबॉयचा खुनीहल्ला! 



नाशिक : खरा पंचनामा

नाशिक शहरात रुग्णालयातच एका महिला डॉक्टरवर वॉर्डबॉयने खुनीहल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या डॉक्टरने मैत्रिणीला रागावलं म्हणून वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. कात्रीने वार केल्याने महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली आहे. 

नाशिकच्या गंगापूर रोडवरील निम्स रुग्णालयात रविवारी रात्री ही घटना घडली होती. यावरून गंगापूर पोलीसांनी वॉर्डबॉय अनिकेत डोंगरेला अटक केली असून गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील महिला डॉक्टरवर हल्ला होण्याची दुसरी घटना असल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

वॉर्डबॉयची मैत्रीण ही याच रुग्णालयात नर्स असून तिच्यावर महिला डॉक्टर रागविल्याने हा हल्ला झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात काही दिवसांपूर्वी डॉ. प्राची पवार यांच्यावर फार्महाऊसमधून बाहेर पडत असतांना धारधार हत्याराने वार करण्यात आले होते. 

ह्या घटनेचा उलगडा होऊन कारवाई होत नाही तोच महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याची दुसरी घटना समोर आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.