Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सरकार पाडण्यासह बदनामीसाठीच देशमुखांना अटक : जयंत पाटील

सरकार पाडण्यासह बदनामीसाठीच देशमुखांना अटक : जयंत पाटीलमुंबई : खरा पंचनामा

गेली चार दशके समाजात, राजकारणात सक्रिय असलेल्या प्रतिष्ठित नेत्यास, एका आरोप्याच्या सांगण्यावरून, ऐकीव माहितीवर अटक करणे अत्यंत निषेधार्ह आहे. तत्कालीन महविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी आमच्या बड्या नेत्यांविरोधात कारस्थान करण्यात आले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. देशमुख यांच्या सुटकेनंतर त्यांनी सूचक ट्विटही केले आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर पाटील माध्यमांशी बोलत होते. देशमुख यांच्यावर का कारवाई करण्यात आली तसेच त्यांना का अडकवण्यात आले हे आता जनतेला कळले आहे असेही पाटील यावेळी म्हणाले. कोणताही आरोप सिद्ध नसताना तब्बल तेरा महिने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. आज उच्च न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची सुटका झाली, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहोत. संपूर्ण महाराष्ट्राने हा घटनाक्रम पाहिलेला आहे. जनता हे कदापि सहन करणार नाही असेही पाटील यावेळी म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.