Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली जिल्ह्यात 122 हुल्लडबाजांवर करवाई

सांगली जिल्ह्यात 122 हुल्लडबाजांवर करवाईसांगली : खरा पंचनामा

वर्ष अखरेच्या पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्हा पोलिस दलाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. शनिवारी रात्री मद्यपींसह हुल्लडबाजी करणाऱ्या १२२ जणांवर पोलिसांनी कारवाईचा केली. शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करत ही कारवाई करण्यात आली.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक उत्सवावर निर्बंध आणले होते. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथील करण्यात आले. त्यानंतर यंदाचा प्रथमच विविध महोत्सवासह उत्सव, सण धडाक्यात आणि धुमधामात साजरे करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जल्लोषी वातावरण सर्वत्र होते.

दरम्यान, शहर आणि परिसरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शनिवारी रात्री पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील प्रमुख चौकांसह महामार्गांवर पोलिसांचा पहारा होता. प्रमुख चौकांसह जिल्ह्यात प्रवेश होणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करत पोलिसांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तपासणी केली. 

मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह खटले दाखल करण्यात आले. तसेच दुचाकीवरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करत हुल्लडबाजी करणाऱ्यावरही कारवाई करण्यात आली. सांगली शहर, संजयनगर, सांगली ग्रामीण पोलिसांनी कडक कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.