खरा पंचनामाचे वृत्त ठरले खरे! जिल्ह्यातील 19 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक पदावरील तब्बल 19 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी याबाबतचे आदेश बुधवारी दिले आहेत. खरा पंचनामाने रविवारीच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असे वृत्त दिले होते. खरा पंचनामाचे वृत्त अखेर खरे ठरले आहे.
पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांची नियंत्रण कक्षातून सुरक्षा शाखेकडे बदली करण्यात आली आहे. मुख्यालय उपअधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे देण्यात आला आहे. सुधीर भालेराव यांची नियंत्रण कक्षातून जिल्हा विशेष शाखेकडे बदली करण्यात आली आहे तर दहशतवाद विरोधी पथकाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांना देण्यात आला आहे.
सहायक निरीक्षक गजानन कांबळे यांची शहरकडून जीविशा, प्रवीण साळुंखे यांची इस्लामपूरहुन पलूसचे प्रभारी म्हणून, अनिल जाधव यांची इस्लामपूरहुन जतला बदली करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे युवराज सरनोबत यांची कुंडलचे प्रभारी म्हणून, मिरज शहरकडील नितीन सावंत यांची भिलवडीचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
भिलवडीचे प्रभारी सहायक निरीक्षक कैलास कोडग यांची वाचक म्हणून, जतचे महेश मोहिते यांची कोकरूडचे प्रभारी म्हणून, विश्रामबाग येथील सिकंदर वर्धन यांची आटपाडीला, कोकरूडचे प्रभारी ज्ञानदेव वाघ यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे, जतचे विनोद कांबळे यांची सांगली शहरकडे, नियंत्रण कक्षाकडील सागर वरुटे यांची इस्लामपूर येथे बदली करण्यात आली आहे.
शिराळा येथील उपनिरीक्षक अविनाश वाडेकर यांची मिरज शहरकडे, संजयनगरचे महेश डोंगरे यांची शिराळा, महात्मा गांधी ठाण्याकडील सोमनाथ कचरे यांची कवठेमहांकाळला, दीपक सदामते यांची आष्टा येथून संजयनगर, सागर पाटील यांची सांगली ग्रामीणकडून मिरज शहरकडे, जगन्नाथ पवार यांची मिरज शहरकडून इस्लामपूर येथे बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.