20 हजारांची लाच घेताना दोन पोलिसांना अटक
ठाणे : खरा पंचनामा
दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना आचोळे पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पोलीस हवालदार योगेश देवरे (वय 36), जितेंद्र बनसोडे (वय-35) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत.
याबाबत एका व्यक्तीने गुरुवारी ठाणे एसीबीकडे तक्रार केली. तक्रारदार यांच्या विरुद्ध मिरा-भाईदर-वसई विरार आयुक्तालयांतर्गत असलेल्या आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी योगेश देवरे व जितेंद्र बनसोडे यांनी 35 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 35 हजार रुपये लालेची मागणी करुन 20 हजार रुपये स्विकारण्यास सहमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच घेताना पोलीस देवरे, बनसोडे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर आचोळे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.