Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जत तालुक्यातील 30 सरपंच करणार शिंदे गटात प्रवेश : मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक!

जत तालुक्यातील 30 सरपंच करणार शिंदे गटात प्रवेश : मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक! ठाणे : खरा पंचनामा 

कर्नाटक सीमा भागातील जत तालुक्यातील 40 गावांचे नागरीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील 'नंदनवन' निवासस्थानावर दाखल झाले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. सीमा भागातील जत तालुक्यामधील तब्बल 30 सरपंच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत. सीमावादावर हा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांसह कर्नाटक सरकारला दिलेला मास्टट्रोक असल्याचं मानलं जात आहे. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागाच्या तणावावरुन गेल्या महिन्यात चांगलंच राजकारण तापल होतं. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील 40 गावांनी तर आपल्याला पाणी मिळत नसल्याने थेट कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे कर्नाटक सरकारने त्याचकाळात महाराष्ट्र सीमा भागात पाणी सोडल्याने अनेक गावांनी कर्नाटकात जाण्याची भूमिका घेतलेली. त्यामुळे तणाव वाढला. राज्यभरात हा मुद्दा गाजला. 

त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत तालुक्यातील सर्व 40 गावांना नियमित पाणी पुरवठा पुरवण्याचं आश्वासन दिलं. तसेच त्यासाठी पाणी योजना आणण्याचं घोषित केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी आपलं हे आश्वासन पाळल्याची माहिती समोर आलीय. मुख्यमंत्र्यांनी सीमाभागातील 40 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. मुख्यमंत्र्यानी या सर्व गावांमध्ये नियमित पाणी पुरवठा सुरु केलाय. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील 40 गावांमध्ये नियमित पाणी पुरवठा सुरु केल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी या सर्व गावातील काही नागरीक ठाण्यात आले आहेत. पाणी प्रश्न सोडवल्यामुळे सीमा भागातील 40 गावांच्या नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्याचं ठरवल्याची माहिती मिळत आहे. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा खरंतर गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद आहे. पण गेल्या महिन्यात कर्नाटक सरकारने अचानक महाराष्ट्रातील काही गावांवर हक्क सांगितला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.