धनुष्यबाण चिन्हाबाबत 30 जानेवारीला अंतिम निर्णय
नवी दिल्ली : खरा पंचनामा
शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचे? या प्रश्नाभोवती मागील तीन आठवड्यापासून राजकीय उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोग अंतिम निर्णय दि. 30 जानेवारीला देणार आहे.
धनुष्यबाण चिन्हावर अधिकार कुणाचा असणार या मुद्दावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे. पण, आता धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय दि. 30 जानेवारीला निवडणूक आयोग देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
30 जानेवारीपर्यंत फक्त शिंदे गट लेखी उत्तर सादर करणार आहे. ठाकरे गट कोणतही लेखी उत्तर निवडणूक आयोगाला सादर करणार नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे 30 तारखेच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागले आहे.
दरम्यान, 16 जानेवारीला झालेल्या सुनावणीमध्ये शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडूनही वकिलांची मोठी फौज युक्तिवादासाठी हजर होती. 'शिंदे गटाने दाखल कागदपत्रही जुनी आहे, महेश जेठमलानी यांनी केलेला दावा हा बोगस आहे. शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही त्यामुळे ही फूट ग्राह्य धरू नये.
ही फूट काल्पनिक असू शकते. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच ही खरी शिवसेना आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निर्णय घेऊ नये, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता.
एखादा गट बाहेर पडला तर त्यात गैर काय आहे. आमदार, खासदारांची जास्त संख्या आमच्याकडे आहे. बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.