Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 3 नावांची घोषणा

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 3 नावांची घोषणामुंबई : खरा पंचनामा

जानेवारीमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये पाच 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघांच्या समन्वयाने पाच विधानपरिषद जागा लढविल्या जाणार आहेत. यासाठी कोकण विधान परिषदेकरीता ज्ञानेश्वर म्हात्रे पश्चिम विदर्भातून रणजीत पाटील आणि मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

नाशिक विधानपरिषद संदर्भात एक दोन दिवसांत निर्णय होईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान, नागपूर विभाग शिक्षकमतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली असताना भाजप आणि काँग्रेसचा उमेदवार ठरत नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता तर मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप प्रणित नागो गाणार हे गेली दोन टर्म आमदार आहे. शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक भाजप थेट न लढता शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा देतात.

मात्र गेल्या काही दिवसात भाजपने ही निवडणूक स्वतःहा लढवावी असा सूर नेत्यांचा होता. त्यामुळे भाजपमधून देखील अनेक नेते उमेदवारी साठी इच्छुक होते. कल्पना पांडे, अनिल शिवणकर यांनी यासाठी कामाला देखील सुरुवात केली होती. अस असताना देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागातील भाजप आमदारांची मते जाणून घेण्यासाठी उच्च स्तरीय बैठक घेतली ज्यात बहुसंख्य आमदारांनी ना गो गाणार यांच्या उमेदवारीला पसंती दिल्याची माहिती पुढे आली. या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या निवडणुकीत शिक्षण परिषदेला पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.