Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इनोव्हाच्या अपघातात दोन महिला ठार, 6 जखमी

इनोव्हाच्या अपघातात दोन महिला ठार, 6 जखमी 



सातारा : खरा पंचनामा 

साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ पुण्याच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कारवरील चालकाचे नियंत्रण सूटल्याने अपघात झाला. यावेळी कारमधील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी मृत झालेल्या महिलांची नावे आहेत. 

सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळून गोकर्ण महाबळेश्वरवरून पुण्याच्या दिशेने जाधव कुटूंबीय त्यांच्या इनोव्हा कार (एमएच 14 डीएफ 6666) मधून निघाले होते. त्यांची कार खंबाटकी बोगद्याजवळ आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार रस्त्यालगत असणाऱ्या कठड्याला धडकली. 

कारचा अपघात झाल्याने तेथून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी या अपघाताची माहिती तात्काळ भुईज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच पोलीस रुग्णवाहिकेला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी मृत व जखमींना तात्काळ शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद भुईज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.